24.2 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्र‘ महालक्ष्मी रेसकोर्स’च्या विषयावर राजकारण नको

‘ महालक्ष्मी रेसकोर्स’च्या विषयावर राजकारण नको

राहुल नार्वेकरांच्या भावाचे थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या महागड्या जागेवरून राजकारण रंगले आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी एक गंभीर आरोप केल्यानंतर रेसकोर्स चर्चेत आले. आता या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात भाजपने उडी घेतली असून महालक्ष्मी रेसकोर्सच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये, असा थेट इशारा भाजपचे माजी नगरसेवक आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. सरकारच्या जवळ असणा-या बिल्डरकडून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा एक विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकावत असल्याचाही आरोप ठाकरे यांनी केला होता.

आता भाजपचे माजी नगरसेवक आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनीही या वादात उडी घेतली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये असा इशारा देतानाच रेसकोर्सच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने पारदशर्कता ठेवावी अशीही मागणी केली आहे. मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे.

जागतिक दर्जाच्या थीम पार्कसह महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावित नूतनीकरणाच्या तुमच्या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो. रेसकोर्स प्लॉटवरील काही जागा थीम पार्कसाठी वापरण्याच्या प्रलंबित मागणीवर निर्णय घेतल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.

मात्र, काही राजकारण्यांकडून गैरसमज निर्माण करून प्रसिद्धीसाठी राज्य सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शहरातील रहिवासी आणि रहिवासी संघटनांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गैरसमज टाळण्यासाठी, योजनेची जलद अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि हा पुनर्विकास अडकणार नाही याची खात्री करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करावी अशी माझी मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR