24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन नियम लागू

दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन नियम लागू

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे लोकांचे हाल झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मंत्री गोपाल राय देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर १३ ते २० नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत ऑड-इव्हन नियम लागू करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली.

सरकारच्या निर्णयानुसार, दिल्लीत बीएस ३ पेट्रोल आणि बीएस ४ डिझेल कारवर बंदी कायम राहणार आहे. तसेच कोणत्याही बांधकांमांना परवानगी नाकरण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीत आता ६वी, ७वी, ८वी, ९वी आणि ११वीचे वर्ग १० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. ऑड-इव्हनदरम्यान १, ३, ५, ७ आणि ९ क्रमांक असलेली वाहने ऑड दिवसांत धावतील. तर ज्या वाहनांचा क्रमांक ०, २, ४, ६ आणि ८ ने संपतो, ती वाहने इव्हन दिवसांत धावतील असे गोपाल राय यांनी सांगितले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळनूसार, संपूर्ण दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत आहे. कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती बुधवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. दिल्लीतील आजच्या वायू प्रदूषणाच्या पातळीबद्दल बोलायचे झाल्यास, आरके पुरममध्ये ४६६, आयटीओमध्ये ४०२, पटपरगंजमध्ये ४७१ आणि न्यू मोती बागमध्ये ४८८ एक्यूआय नोंदवण्यात आले.

दिल्लीत वैद्यकीय आणीबाणी
दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार म्हणाले की, दिल्लीतील प्रदूषण गेल्या काही दिवसांपासून गंभीर आहे. हवेची गुणवत्ता ५००च्या वर पोहोचली आहे. ही वैद्यकीय आणीबाणी आहे. लोकांना श्वास घेण्यास त्रास, घसा दुखणे, खोकला आणि डोळ्यात जळजळ होत आहे. दररोज किमान २५ ते ३० रुग्ण येत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी मास्क लावला पाहिजे असे वैद्यकीय संचालकांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR