जगातील ३९० अधिक प्रदूषित शहरांपैकी १३८ भारतात

बंगळूरू : भारतीय शहरांची वाढ ही प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाच्या (पेट्रोल-डिझेल आणि दगडी कोळसा) वापराशी आणि त्यातून निर्माण होणा-या प्रदूषणाशी निगडित राहिली आहे. परिणामी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. जगभरातील ३९० अधिक प्रदूषित आणि अधिक समृद्ध शहरांपैकी १३८ शहरे (किंवा सुमारे ३५.४%) भारतात आहेत, असे भीषण वास्­तव नेचर सिटीज या नियतकालिकात प्रकाशित रिपोर्टमध्­ये मांडण्­यात आले आहे. विशेष म्­हणजे चीनमधील (७१९ शहरे ) आणि इतर अनेक देशांनी स्वच्छ शहरीकरणाच्या बाबतीत आघाडी घेतली असल्­याचेही या अहवालात स्­पष्­ट करण्­यात आले आहे.

‘नेचर सिटीज’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये जगभरातील ५,४३५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. २०१९ ते २०२४ या काळातील उपग्रहांचा डेटा, नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण आणि शहरांचे एकूण आर्थिक उत्पन्न यांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

संशोधकांनी वाहने, उद्योग आणि औष्णिक वीज प्रकल्पांतून निघणा-या नायट्रोजन डायऑक्साइडच्या उपग्रहीय नोंदी घेतल्या. त्यांची तुलना शहरांच्या जीडीपीशी केली. त्यानुसार शहरांचे स्वच्छ आणि श्रीमंत, प्रदूषित आणि श्रीमंत, स्वच्छ आणि गरीब आणि प्रदूषित आणि गरीब अशी वर्गवारी करण्­यात आली. अभ्यासात समाविष्ट केलेल्या ९०२ भारतीय शहरांपैकी १५.३% शहरांमध्ये २०१९ ते २०२४ दरम्यान एनओ२ च्या पातळीत झालेली वाढ चिंताजनक आहे. ‘प्रदूषित आणि श्रीमंत’ श्रेणीत भारताचा वाटा जगात सर्वाधिक (३५.४%) आहे. संशोधकांच्या मते ही अपयशी शहरे नसून वेगाने वाढणारी शहरे आहेत, पण त्यांची वाढ प्रदूषणासोबत होत आहे. तसेच, भारत प्रदूषित आणि गरीब या सर्वात चिंताजनक श्रेणीतही दिसला, जिथे आर्थिक प्रगती खुंटली आहे पण प्रदूषण वाढत आहे.

शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश
जगभरातील ३९० शहरे अधिक प्रदूषित आणि अधिक श्रीमंत’ या श्रेणीत आली आहेत. म्हणजेच, येथे आर्थिक विकास तर झाला, पण सोबतीने प्रदूषणही वाढले. विशेष म्हणजे, या ३९० शहरांपैकी १३८ शहरे (सुमारे ३५.४%) एकट्या भारतात आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांनी स्वच्छ विकास दाखवला असला, तरी भारतातील इतर अनेक शहरे अजूनही वाहतूक, उद्योग आणि वीज निर्मितीसाठी कोळसा, पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील पहिल्या १० ‘प्रदूषित आणि श्रीमंत’ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03

Latest news