23.2 C
Latur
Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुस्लिम आरक्षणासाठी उलेमा बोर्डाच्या पदाधिका-यांनी घेतली पवारांची भेट

मुस्लिम आरक्षणासाठी उलेमा बोर्डाच्या पदाधिका-यांनी घेतली पवारांची भेट

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता मुस्लिम आरक्षणाची मागणी पुढे येताना दिसत आहे. या मागणीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या प्रमुख पदाधिका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वायबी चव्हाण येथे जाऊन भेट घेतली. सेंटरमुस्लिम समजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, असा निर्णय कोर्टाने दिलेला असून हे सरकार त्याची अंमलबजावणी करत नसल्यामुळे याप्रकरणी शरद पवारांनी हस्तक्षेप करावा, ही मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन जोर धरत आहे. समाजाच्या मागणीचा विचार करत राज्य सरकारने कुणबी म्हणून नोंदी असलेल्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठावाड्यात प्रमाणपत्र वाटप सुरु असून राज्याच्या इतर भागांमध्ये नोंदींचा अभ्यास केला जात आहे.

दरम्यान, ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोध करत ओबीसी एकजुटीची तयारी सुरु केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, असं म्हणत कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने ओबीसींवर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR