32.5 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeपरभणीकृषिभूषण पुरस्काराने ओंकार शिंदे सन्मानित

कृषिभूषण पुरस्काराने ओंकार शिंदे सन्मानित

परभणी : तालुक्यातील सनपुरी येथील प्रगतीशील शेतकरी ओंकार आनंदराव शिंदे यांना दि.२९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाकडून वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते देऊन सपत्निक सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना वर्ष २०२२ चा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला होता.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रगतशील शेतकरी आपल्या शेतात नवनवीन यंत्रांच्या वापराबरोबरच एकात्मिक शेती पद्धती, कृषी पूरक व्यवसाय मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन यासह बीज उत्पादन कार्यक्रम देखील घेतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR