30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयकेंद्रीय मंत्र्याच्या कारचा दरवाजा उघडल्याने एकाचा मृत्यू

केंद्रीय मंत्र्याच्या कारचा दरवाजा उघडल्याने एकाचा मृत्यू

बंगळूरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरूमधील केआर पुरम येथे सोमवारी केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांच्या कारच्या उघडलेल्या दरवाजाला धडकल्यानंतर, एका स्कूटी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केआर पुरम परिसरातील गणेश मंदिराजवळ ही घटना घडली. प्रकाश असे मृताचे नाव आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, मंत्री शोभा करंदलाजे या कारमध्ये होत्या आणि प्रचारासाठी जात होत्या. सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, करंदलाजे यांच्या कारचा दरवाजा उघडताच, प्रकाश दरवाजाला धडकून खाली पडला आणि मागून येणा-या ट्रकने त्याला चिरडले. मात्र, दरवाजा करंदलाजे यांनी उघडला, की आणखी कुणी? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात मंत्री करंदलाजे यांची अद्याप कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

बंगळूरू वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रचारात व्यस्त होत्या. त्या आपल्या फॉर्च्युनरमधून उतरून प्रचारासाठी एका गल्लीत गेल्या होत्या. दरम्यान, कारमध्ये बसलेल्या चालकाने अचानक दरवाजा उघडला, यामुळे मागून येणारा ६२ वर्षीय प्रकाश होंडा अ‍ॅक्टिव्हासह खाली पडला. तेवढ्यात मागून येणा-या ट्रकने त्यांला चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR