28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडनांदेड-माजलगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

नांदेड-माजलगाव महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

ताडकळस / प्रतिनिधी
नांदेड माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावरील ताडकळस ते पूर्णा दरम्यान असलेल्या पुनकळस पाटी जवळ अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की ताडकळस हुन पूर्णा कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच २२ ए. वाय. ४८२८ पूनकळस पाटी जवळ आली असता ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५:३० च्या दरम्यान अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडक जोरदार असल्याने यात आकाश उर्फ बंटी पिता सखाराम सोनवणे वय वर्षे २३ राहणार ब्राह्मणगाव याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजतात ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनी कपिल शेळके यांच्या सह सहाय्यक फौजदार भास्कर बर्गे ,पोलीस नाईक संभाजी शिंदे ,पोलीस कॉन्स्टेबल भगवान चोरघडे ,होमगार्ड सिताराम जाधव आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील तपास करत आहेत.

अद्याप या घटनेची कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलीस प्रशासन ताडकळस यांच्याकडून सांगण्यात आले. मागील दोन दिवसांत ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरा भिषण अपघात असुन यात दोन जन मृत पावल्याने ताडकळस व परिसरात वाहनधारकांसह नागरिकांमध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR