Homeधाराशिवट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून एक ठार, एक जखमी

ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून एक ठार, एक जखमी

भूम : भूम-अहिल्यानगर रोडवर अंतरवली फाट्यानजीक तलावाच्या खालच्या बाजूला पुला जवळ खर्डा जवळील मोहरी गाव येथून भूमकडे जात असणारे दुचाकीस्वार उसाच्या ट्रॅक्टर ट्रोलीला धडकल्याने एक मयत तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

दुचाकीस्वार भूम तालुक्यातील वंजारवाडीकडे जात असताना दुचाकी स्वराचा उसाच्या ट्रॉलीला धडकून अपघात झाला. जखमींला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कळंब तालुक्यातील बोर्डी गावचे भगवान भानुदास मासाळ व भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील शेषराव माधव मिसाळ खर्डा जवळील महुरी या गावी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारा नंतर परत वंजारवाडी गावाकडे परत येत असताना आंतरवली फाट्याजवळ उसाच्या ट्रॉलीला धडक बसल्याने कळंब तालुक्यातील बोर्डी गावचे भगवान भानुदास मिसाळ(५५) ठार झाले तर शेषराव माधव मिसाळ जखमी झाले आहेत. त्यांना खर्डा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती आंबी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरक्ष खराड यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR