22.4 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeपरभणीप्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : डॉ.संजय रोडगे.

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : डॉ.संजय रोडगे.

श्रीराम प्रतिष्ठान शालेय क्रीडा स्पर्धा

सेलू प्रतिनिधी
येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन शनिवार रोजी विद्याविहार संकूल येथे करण्यात आले आहे.या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृउबा समितीचे माजी सभापती मा. रवी डासाळकर , कृउबा समितीचे संचालक तथा भाजपा तालुकाध्यक्ष मा. दत्ता कदम, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगावकर, संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तीक रत्नाला, प्रॉस्पेरस पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रा. प्रगती क्षीरसागर, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

एक दिवशीय शालेय क्रीडा स्पर्धेत इ. १ व ते १० वीच्या मुलामुलींकरिता खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, थ्रो बॉल, क्रिकेट , बास्केटबॉल, रनिंग, संगित खुर्ची, लिंबु चमचा, सायकल रेस, लंगडी आदी क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शालेय क्रीडा स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, प्रॉस्पेरस पब्लिक स्कूल, आदिवासी एकात्मिक प्रकल्प, धनगर सामाजिक विकास प्रकल्प आदी विभागातील एकुण 3200 विद्यार्थी सहभाग घेतील.

जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाचे माध्यमातून विविध स्पर्धा खेळून आपले नावलौकिक मिळविले पाहिजे तसेच खेळ कोणताही असो त्या स्पर्धेत भाग घेऊन एक चांगला स्पर्धक म्हणून नाव चर्चेत ठेऊन समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे तसेच मैदानात उतरल्यावर जिंकण्याच्या जिद्दीनेच खेळ खेळला पाहिजे म्हणजे नंबर किंवा बक्षीस हे आपोआपच मिळेल असे उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ संजय रोडगे म्हणाले.

विद्यार्थ्याने शालेय जीवनात प्रत्येक क्रीडा स्पर्धेंत सहभाग नोंदविला पाहिजे. ज्या क्रीडा प्रकारात आवड आहे त्याकडे जास्त लक्ष देऊन सरोत्कृष्ठ कसे बंता येईल हे पहिले पाहिजे. मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांच्या सानिद्यात राहवून दररोज सराव केला पाहिजे.यातून आपल्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन दत्ता कदम यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी तर आभार जुलाहा खूद्दुस यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR