सोलापूर : शहर शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सोलापूर यांना प्रीपेड मीटर बसवण्यास शिवसेनेचा विरोध असलेले निवेदन देण्यात आले याप्रसंगी वीज कायदा २०२३ च्या कलम ५५ नुसार ग्राहकांना त्यांचे मीटर निवडण्याचा संपूर्ण हक्क असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले व वीज ग्राहकांवर कसल्याही प्रकारची जबरदस्ती केल्यास शिवसेना त्यांच्या स्टाईलने विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता मेहता यांनी शिवसेनेची भूमिका समजावून घेऊन शिष्टमंडळाच्या व पक्षाच्या भावना वरिष्ठ अधिका-यांना कळविण्याचे मान्य केले तसेच शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख महेश धाराशिवकर जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की त्यांच्यावर जर प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती करण्यात आली तर शिवसेनेधी संपर्क साधावा. याप्रसंगी शहर प्रमुख महेश भैया धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊ चव्हाण, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहु गायकवाड, विभाग प्रमुख आबा सावंत महेश गवळी, मुल्ला, दत्ता खलाटे,उपशहर प्रमुख प्रमुख सुरेश जगताप, शाखाप्रमुख मारुती खानापूरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.