पुणे /प्रतिनिधी : येत्या दि २ आणि ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील ओझर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये मंदिरांचे सरकारीकरण,अडचणी,आणि मंदिरातील वस्त्र संहिता यासह अन्य विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी ही माहिती पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले दोन दिवसीय परिषदेत अनेक विषय असणार आहेत .मंदिरातील दैनदिन पुजा अर्चा, मंदिरांच्या समस्या ,परंपरांचे रक्षण ,दर्शन रांगांचे नियोजन ,मंदिर जमीनीवरील अतिक्रमण आदि विषयांचा समावेश आहे.
राज्याच्या विविध भागात २६२ मंदिरे आहेत . परिषदेत मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ,पुरोहित, अभ्यासक आदि सहभागी होणार आहेत .याआधी जळगाव येथे पहिली परिषद झाली होती. दोन दिवासीय परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. या क्षेत्रातले तज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत.श्री विघ्नहर गणपती मंदिर ,लेण्यांद्री गणपती मंदिर देवस्थान आणि श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ,हिंदू जनजागृती समिती परिषद नियोजनात सहभागी आहेत असे ते म्हणाले .