उस्मानाबाद : प्रतिनिधी
ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून एका दुचाकीला पाठिमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मयत झाला. सदर अपघात वडगाव (ज.) शिवारात घडला.
जवळगा (ता. जेवर्गी, जि. गुलबर्गा) येथील शरणबसप्पा मल्लीकार्जुन कुंभार 19 जानेवारी रोजी वडगाव (ज) पाटीकडून येडशीकडे रोड क्रॉस करत होते.
दरम्यान कुंभार यांनी आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. केए 01/एजे/4713) हयगयीने व निष्काळजीपण चालवून एका मोटरसायकलीला पाठिमागून धडक दिली. या अपघातात बावी (आगलावे) ता. बार्शी येथील मोटरसायकल चालक सुनिल चंद्रभान आगलावे (वय 50) हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रक चालक अपघात स्थळावरून पसार झाला. याप्रकरणी दत्तात्रय मारूती नवले (रा. वडगाव, ता. कळंब) यांनी 20 जानेवारी रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भादंसं कलम 279, 304 (अ) सह मोटार वाहन कायद्याचे कलम 134 (अ) (ब), 184 अंतर्गत शरणबसप्पा मल्लीकार्जुन कुंभार याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.