29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeक्रीडाआयपीएल ट्रॉफी जिंकणे हेच आमचे एकमेव ध्येय : गौतम गंभीर

आयपीएल ट्रॉफी जिंकणे हेच आमचे एकमेव ध्येय : गौतम गंभीर

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२४ सुरू होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आगामी स्पर्धेसाठी सर्वच संघ आपापल्या खेळाडूंकडून जोरदार तयारी करून घेत आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतलेल्या गौतम गंभीरने आयपीएल २०२४ पूर्वी गंभीर वक्तव्य केले आहे. गंभीर म्हणाला की, आमच्या संघात कोणी सीनियर-ज्युनियर नाही. आमचे एकमेव ध्येय आयपीएल ट्रॉफी जिंकणे हा आहे.

गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने २ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता गंभीर पुन्हा एकदा केकेआरमध्ये परतला आहे. आता तो केकेआरसोबत मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. कोलकाताने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर गौतम गंभीरच्या भाषणाचा एक व्हीडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गंभीर म्हणत आहे की, तुम्ही एका यशस्वी फ्रँचायझीसाठी खेळत आहात. त्यामुळे तुम्ही चांगला सराव करून मैदानात उतरता आणि जिंकण्याच्या प्रवृत्तीने खेळा. माझ्यासोबत खेळलेल्या लोकांना हे चांगलं माहीत आहे की या संघात सगळ्यांना सारखेच वागवले जाते. इथे कोणी सीनियर-ज्युनियर नाही. येथे कोणताही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू नाही, तुम्हाला या संघात पूर्ण स्वातंत्र्य असेल, असे गंभीरने आपल्या संघातील खेळाडूला उद्देशून म्हणाला.

आयपीएल २०२४ ट्रॉफी जिंकणे हे एकमेव ध्येय

दरम्यान, केकेआरसाठी मागील काही हंगाम चांगले राहिले नाहीत. गेल्या मोसमात संघाला टॉप-४ मध्येही स्थान मिळाले नव्हते. आता गंभीर केकेआरसोबत जोडला गेला आहे, गंभीरने आयपीएलची ट्रॉफी जिंकणे हे आमचे एकमेव ध्येय आहे, असे म्हटले आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने त्याचे पालन केले पाहिजे. कठोर सराव करून २६ मे रोजी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजपासूनच तयारी करावी लागेल असे गंभीर म्हणाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR