35.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनखुशी कपूरच्या ‘नादानियां’च्या शुटिंगला सुरूवात

खुशी कपूरच्या ‘नादानियां’च्या शुटिंगला सुरूवात

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून अभिनय कारकिदीर्ला सुरुवात केली आहे. आता ती दिग्दर्शक शौना गौतमच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

वास्तविक, इब्राहिम आणि खुशी कपूरच्या चित्रपटाच्या शूटिंगचा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे, जो लगेच व्हायरल झाला. या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू आहे. एका सोशल मीडिया वापरकत्यार्ने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून सांगितले की, खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान पुण्यातील एका खासगी विद्यापीठात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये खुशी कपूरने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे ‘नादानियां ’
दरम्यान, धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नादानियां नावाचा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट तयार होत आहे, ज्यात खुशी कपूर आणि इब्राहिम अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शौना गौतमच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाबद्दल करण जोहरही खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचा मुहूर्त शॉटही त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. खुशी आणि इब्राहिमचा हा चित्रपट थेट ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR