पेनकिलरच्या गोळयांमुळे किडनींवर परिणाम

मुंबई : शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकणे, द्र्रवपदार्थांचे संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अशी कामे आपली किडनी नियमितपणे करत असते. मात्र आपल्या रोजच्या काही सवयी हळूहळू या अवयवांवर परिणाम करत असतात. यामध्ये दोन मुख्य गोष्टी म्हणजे वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेनकिलर गोळ्यांचा वारंवार वापर आणि मीठाचे अतिप्रमाणात सेवन होय. यामुळे आपल्या किडनीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

डोकेदुखी, ताप, अंगदुखी यासारख्या गोष्टींवर आपण अनेकदा सहजपणे अनेक वेदनाशामक गोळ्या घेतो. कधीमधी घेतल्यास या सुरक्षित असल्या तरी, वारंवार किंवा दीर्घकाळ वापरल्यास या किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी करतात. त्यामुळे टॉक्सिन्स फिल्टर करण्याची क्षमता घटते असे झाल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्यांना किंवा वयोवृद्धांना याचा धोका अधिक असतो. आरामासाठी घेतलेली छोटी गोळी हळूहळू एक अदृश्य धोका ठरू शकते
असे मत युरोलॉजिस्ट डॉ. मंगेश पाटील यांनी व्यक्त केले.

मीठ हा आणखी एक शांत शत्रू आहे. फक्त चवीनुसार टाकलेले मीठ नव्हे, तर लोणचे, पापड, पॅकबंद स्रॅक्स, इंस्टंट फूड्स आणि रेडीमेड जेवणांमधूनही आपल्याला प्रचंड मीठ मिळते. जास्त मीठ घेतल्याने रक्तदाब वाढतो जे किडनी विकाराचे मुख्य कारण आहे आणि यामुळे किडनीवर अधिक ताण येतो. इतकंच नाही, तर किडनीतून प्रथिने लीक होण्यास सुरुवात होते, हे किडनी निकामी होण्याचे पहिले लक्षण असू शकते. किडनी रोगाचे सर्वात चिंताजनक वैशिष्टय म्हणजे तो सुरुवातीला कुठलाही त्रास देत नाही. बराच वेळ लोकांना काहीही त्रास जाणवत नाही आणि जेव्हा सूज, थकवा, लघवी कमी होणे असे लक्षणे दिसू लागतात, तेव्हा कधी कधी डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय उरतो.

किडनीचे संरक्षण कसे करावे?
– वेदनाशामक औषधे केवळ अत्यावश्यकते नुसारच आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
– दीर्घकालीन वेदनेसाठी एक्सरसाईज, फिजिओथेरपी किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्सचा विचार करावा.
– मीठाचे प्रमाण दिवसाला एक चमच्यापेक्षा कमी ठेवा. शक्यतो ताजे जेवण बनवा आणि पॅकबंद पदार्थांपासून दूर राहा.
– धोका अधिक असलेल्यांनी म्हणजेच उच्च रक्तदाब, मधुमेह व वयोवृद्ध असलेल्यांनी नियमितपणे रक्तदाब आणि किडनी फंक्शन तपासून घ्यावे.
– थोड्याशा जीवनशैलीतील बदलांनीही आज आपण आपली किडनी सुरक्षित ठेवू शकतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news