25.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeलातूरसेवानिवृत्ती निमित्त पांडुरंग देडे यांचा सपत्निक सत्कार

सेवानिवृत्ती निमित्त पांडुरंग देडे यांचा सपत्निक सत्कार

लातूर : समता मा.व.उ विद्यालय जोडजवळा येथील वरीष्ठ लिपिक पांडुरंग देडे यांचा दि. ३० जून रोजी ३१ वर्षे सेवा देऊन निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा येथे सपत्निक सत्कार करण्यात आला.

किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे या संस्थेतील लातूर येथील यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन, खाडगाव रोड येथे २९ वर्ष तर जोडजवळा येथील समता मा.व.उ विद्यालयामधे २ वर्ष अशी ३१ वर्ष सेवा दिल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य अनिल काळे यांच्या हस्ते सपत्निक शॉल, पुष्पहार व पुर्ण आहेर देऊन माजी मुख्याध्यापक तसेच देडे यांचे मार्गदर्शक शिक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना देडे यांनी शिक्षणमहर्षी वसंतराव काळे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत सेवा काळातील प्रारंभिक संघर्ष व आठवणींना उजाळा दिला. प्रा. अनिल काळे यांनी सेवानिवृत्तीनंतर च्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देत देडे यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा व कार्य करत राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. माजी मुख्याध्यापक विजयकुमार चव्हाण यांनी देडे यांचा सार्थ ज्ञानेश्वरी व स्वलिखित पुस्तक भेट देत सत्कार करून मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अच्युतराव काळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली कांबळे यांनी केले तर आभार प्रा. भाऊराव वनकुद्रे यांनी मानले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सपकाळ, सौ. प्रेमा पांडुरंग देडे, सौ, सुजाता अच्युतराव काळे, सौ. अंजली कुलकर्णी, भागवत जोशी, कु. सरगम जोशी, चि. अंकुर देडे तसेच विद्यालयातील सहशिक्षक कमलाकर काळे, विनायक सोळंके, शालिग्राम जिरंगे, शंकर पंडित, माधव पिटलेवाड, राजकुमार टिपराळे, प्रा. अश्विन कांबळे, प्रा. शिवाजी राठोड, उकिरडे मामा, जाधव मामा व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR