23.7 C
Latur
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंनी फोडला हंबरडा

पंकजा मुंडेंनी फोडला हंबरडा

बीड : प्रतिनिधी
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. चिंचेवाडी येथील युवकाच्या घरी सांत्वन करण्यासाठी पंकजा मुंडे आज गेल्या होत्या. यावेळी एकच कल्लोळ झाला. नातेवाईकांचा आक्रोश पाहून पंकजा मुंडे देखील रडल्या.

दरम्यान, आठवडाभरात पंकजा मुंडेच्या ४ समर्थकांनी आपले जीवन संपवले. पराभव जिव्हारी लागल्याने मुंडे समर्थक आत्महत्या करत आहेत. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन देखील केले होते. मात्र आत्महत्यांचे सत्र अजून थांबले नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव करत १५ वर्षांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. बजरंग सोनवणे यांनी ६,५८५ मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.

पंकजा मुंडे चिंचेवाडी येथे असताना पुन्हा एका समर्थकाने लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथे रविवारी, १६ जून रोजी घडली. गणेश (उर्फ) हरिभाऊ भाऊसाहेब बडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR