34.4 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeपरभणीप्रेमविवाहास विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

प्रेमविवाहास विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

परभणी : महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेमविवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथे २१ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे.

या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आले आहे. संपूर्ण राज्याला हादरवणा-या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस? म्हणून परभणीत १९ वर्षीय मुलीचा जन्मदात्यानेच खून केला आहे. २१ एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला आहे.

मुलीच्या अन्त्यविधीला उपस्थित असणा-या लोकांनाही घटनेची माहिती होती. पण याबाबत कोणीही पोलिसांना कल्पना दिली नाही. पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती मिळताच मयत मुलीच्या आई-वडिलांसह ८ जणांविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR