22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रस्थगित झालेले मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा

स्थगित झालेले मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. हा महायुती सरकारचा मोठा विजय असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटीव्ह याचिका स्वीकारल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेले मराठा आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बावनकुळे म्हणाले.

राज्यातील महायुती सरकारने भक्कमपणे सुप्रीम कोर्टात बाजू मांडल्यामुळे कायदेशीर मराठा आरक्षण मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगित झालेले मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मजबुतीने मांडेल आणि मराठा समाजाला न्याय देईल ही खात्री असल्याचे ट्वीटमध्ये जरांगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR