22.6 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रलालबागचा राजाच्या दर्शनावरून पवार ‘टार्गेट’

लालबागचा राजाच्या दर्शनावरून पवार ‘टार्गेट’

मुंबई : शरद पवारांना देव आठवले, चाळीस वर्षांत असे पहिल्यांदाच घडले आहे असे म्हणत भाजप शरद पवारांवर टीकेचे बाण डागले. मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचे शरद पवारांनी सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी दर्शन घेतले. शरद पवारांचे फोटो पोस्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना लक्ष्य केले.

भाजप आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर काय झाले असा सवाल विरोधी पक्षांनी केला. आपल्या बहुआयामी विकासामुळे, एफडीआयमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. पण, महायुती आल्यानंतर जो मोठा बदल झाला तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दरबारातून आजचे चित्र समोर आले आहे असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. शरद पवारांना देव आठवले. महायुती आल्यानंतरचे हे बदल आहेत. चाळीस वर्षांत पहिल्यांदा असे घडले. याला राजकीय पोळी भाजणे म्हणतात अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चाळीस वर्षांनंतर शरद पवार रायगडावर गेले होते. आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ३० वर्षांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला शरद पवार आले आहेत. मला वाटते की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना, आता रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण पवारांना आली आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

मी लालबागचा राजाला प्रार्थना करतो की, यांना हिंदुत्वाच्या बाबतीत सुबुद्धी देवो. परंतु, ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवारांसमोर प्रभू रामचंद्रांचा, विठुरायाचा, हिंदुत्वाचा अपमान केला. त्यावर काही न बोलता, दुस-या दिवशी लालबागचा राजाच्या दर्शनाला जायचे. मला वाटते की, हे निवडणुकीच्या दृष्टीने का होईना नौटंकी का होईना, लालबागचा राजाने यांना सुबुद्धी दिलेली आहे. महाराष्ट्रातील यांचे हे ढोंगी प्रेम, ढोंगी श्रद्धा समजून येतात असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR