20.2 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeराष्ट्रीययूपीत मिग-२९ विमान कोसळले

यूपीत मिग-२९ विमान कोसळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मिग २९ कोसळल्यानंतर जमिनीवर पडताच विमानाने पेट घेतला. यावेळी विमानातून पायलटसह दोन लोकांनी विमानातून बाहेर उडी घेतली. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. विमान ज्या ठिकाणी कोसळले, त्या ठिकाणापासून दोन किमी अतंरावर पायलट आणि त्याचे सहकारी आढळून आले. कागारौल गावाच्या सोनिगा गावाजवळ मोकळ््या शेतात हे विमान कोसळले. त्यानंतर या विमानाने पेट घेतला. त्यामुळे हे विमान जळून खाक झाले.

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग २९ उत्तर प्रदेशातील आग्राजवळ सोमवारी कोसळले. संरक्षण अधिका-यांनी सांगितले की, पंजाबमधील आदमपूर येथून या विमानाने उड्डाण केले होते आणि ही घटना घडली, तेव्हा ते एका सरावासाठी आग्राला जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहोचले. विमान शेतात कोसळताना पाहून गावातील लोकही घटनास्थळी पोहोचले. या दुर्घटनेचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे या दुर्घटनेनंतर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले. तसेच दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी संबंधित विभागाला सतर्क करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR