काठमांडू : नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
आज (दि.२४) सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान क्रॅश झाले आहे, अशी माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. हे विमान कांठमांडूहून पोखराकडे निघाले होते. त्यावेळी हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातावेळी विमानात क्रू मेंबर्ससह १९ जण होते. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपाचळीवर सुरू करण्यात आले असून, यात १८ जणांचा मृत्यू झाला असून, पायलट जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौर्य एअरलाईन्सचे विमानाने सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखराकडे उड्डान भरले होते. मात्र, उड्डाण भरतानाच अचानक विमान क्रॅश झाले. अपघातवेळी विमानात क्रू मेंबर्ससह १९ जण प्रवास करत असल्याचे वृत्त नेपाळच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरले होते विमान
काठमांडू पोस्टने विमानतळावरील सूत्रांचा हवाला देत टेक-ऑफदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे म्हटले आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली असून, घटनेवेळी विमानात क्रू मेंबर्ससह १९ जण प्रवास करत होते. विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमनदल तसेच बचावकार्यसाठी नेपाळ सरकारने घटनास्ठळी सैन्य दलाचे जवान तसेच वैद्यकीय पथक रवाना केले आहेत.