30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeसोलापूरवारकर्‍यांना पिण्यासाठी पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा करण्याचे नियोजन

वारकर्‍यांना पिण्यासाठी पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा करण्याचे नियोजन

सोलापूर – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्ह्यात मानाच्या १० पालख्यांच्या मार्गावरील ७७ गावाम ध्ये वारकऱ्यांसाठी १९२ शासकीय व ९७ खाजगी व इतर १० असे एकूण २९९ टँकरने पिण्यासाठी पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगितले की, आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हयात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दि. १० जुलै २०२४ रोजी तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दि.११ जुलै २०२४ रोजी प्रवेश करीत आहे. जिल्हयात ९ तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताबाई, संत सोपानकाका म हाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत गजानन महाराज, संत निळोबाराय महाराज, श्री क्षेत्र कौडण्यपूर, संत योगीराज चांगावटेश्वर महाराज या दहा मानाच्या पालख्या प्रवेश करतात. त्यामुळे सदर मानाच्या १० पालख्यांच्या मार्गावरील ७७ गावामध्ये वारक-यांसाठी १९२ शासकीय, ९७खाजगी व इतर १० अशा एकूण २९९ टैंकरने पिण्यासाठी पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी बोअर व विहीर अशा एकूण ७९१ स्रोत निश्चित करून या स्रोतांचे जलशुध्दीकरण करण्यात आले आहे. तसेच पाणी शुध्दीकरणासाठी प्रती २५ किलोचे १ हजार ५३० इतकी पोती टी.सी. एल. पावडरचा पुरवठा पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना करण्यात आला आहे. आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या वारक-यांना पिण्यासाठी शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपविभाग, आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सदर अधिकारी व कर्मचारी यांना पाणी पुरवठा नियमन करणे, टी. सी. एल. पावडरचा पुरवठा करणे, पाणी स्रोतांच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे, टैंकर भरण्याच्या जागा निश्चित करणे, पालखी मार्गावरील सर्व उदभवांचे सर्वेक्षण करणे, पाणी नमुने तपासणी करणे, पाणी शुध्दीकरण करून पुरवठा करणे या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे.

पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या सर्व उद्भवांचे सर्वेक्षण करणे, पाणी नमुने तपासणी करणे आणि वारक-यांना पाणी शुध्दीकरण करून पुरवठा करणे आदी कामे अतिशय जबाबदारीने करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दक्षता घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR