28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रसांगलीत वृक्षारोपणाची पैज

सांगलीत वृक्षारोपणाची पैज

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा एक पैज लागली आहे. मात्र ही पैज सामाजिक उपक्रमाची लागली असून या आगळ्या-वेगळ्या पैजेविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील जिंकणार की काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष लढणारे विशाल पाटील विजयी होणार, यावरून पैज लागली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे नाव चर्चेतही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे दुचाकी गाड्यांची पैज लावणा-यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा पैज लागली आहे. ही पैज पैशांची किंवा वस्तूची नसून सामाजिक बांधीलकीची आहे. सामाजिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून निसर्ग संवर्धनाची ही पैज लावण्यात आली आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे एका अनोख्या पैजेची चर्चा रंगली आहे. पर्यावरणपूरक अशा ५१ झाडांच्या वृक्षारोपणाची ही पैज आहे.

भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील हे जर या निवडणुकीत निवडून आले तर तात्यासाहेब शिंदे हे ५१ झाडांची लागवड करणार आहेत. आणि काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील जर निवडून आले तर महादेव हिंगमिरे हे ५१ झाडांचे वृक्षारोपण करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR