गुरूदासपूर : हिमाचलनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील पूरग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण करत केले. यानंतर ते गुरुदासपूरमधील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना भेटले आणि त्यांच्या समस्या ऐकल्या.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी कुल्लू, मंडी आणि चंबा येथील नुकसानीचे हेलिकॉप्टरने हवाई सर्वेक्षण केले. त्यानंतर, धर्मशाला येथे आपत्तीसंदर्भात एक बैठक झाली, ज्यामध्ये अधिका-यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे नुकसानीची माहिती दिली. यावेळी त्यांनी १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे पंतप्रधान म्हणाले. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये दिले जातील. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे देखील या बैठकीत उपस्थित होते. यानंतर, पंतप्रधानांनी मंडी, कुल्लू आणि चंबा जिल्ह्यातील १८ बाधितांची भेट घेतली आणि त्यांची आपबिती ऐकून घेतली. त्यांनी एक वर्षाच्या नीतिकाचीही भेट घेतली, जिचे आई, वडील आणि आजीचा ३० जून रोजी मंडीमध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्यू झाला. पंतप्रधानांनी प्रथम नीतिकाला टॉफी दिली आणि नंतर तिला आपल्या मांडीवर घेतले.
तत्पूर्वी, ५ सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अमृतसर, गुरुदासपूर आणि कपूरथला येथील पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि पीडितांची भेट घेतली.