26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeधाराशिवयेडोळा, लोहगाव शिवारात दारू अड्ड्यावर पोलिसांचे छापे

येडोळा, लोहगाव शिवारात दारू अड्ड्यावर पोलिसांचे छापे

धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील येडोळा व लोहगाव शिवारात असलेले गावठी दारू निर्मितीचे अड्डे नळदुर्ग पोलीसांनी उद्धवस्त केले. पोलीसांनी ४ लाख ३१ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांच्या विरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी येडोळा व लोगाव शिवारात दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्नील लोखंडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. येडोळा व लोहगाव गावाचे हद्दीत गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टया सुरु आहेत. याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांना देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे नळदुर्ग ठाण्याचे पथक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी येडोळा व लोहगाव येथे जावून छापा मारला.

येडोळा व लोहगाव शिवारात राजू धोंडीबा राठोड, संजय सिध्दु राठोड, जालींदर रेवण पवार, लक्ष्मी प्रकाश आडे सर्व रा. येडोळा, ता. तुळजापूर यांच्याजवळ ४ हजार ६०० लिटर गावठी दारु निर्मीतीचे आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिकद्रव्य बाळगलेले मिळून आले. हे द्रव नाशवंत असल्याने ते जागीच ओतून नष्ट करण्यात आले. मद्य निर्मिती साहित्य व मद्याची एकत्रीत किंमत अंदाजे ४ लाख ३१ हजार ३०० रूपये आहे. या प्रकरणी चार आरोपी यांचे विरुध्द नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधीकारी निलेश देशमुख यांचे मार्गदशर्नाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे, सुरज देवकर, पोलीस उपनिरीक्षक संजय झराड, तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग पोलीस अंमलदार, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग धाराशिवचे पोलीस निरीक्षक श्री. कवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मुंडे, पोलीस उपनिरीक्षक पवन मुळे यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR