सोलापूर : संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सोलापूर मधील विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणा-या रत्नांना प्रज्ञावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अॅड प्रदीपसिंग राजपूत (सीबीआयचे विशेष सरकारी वकील), तर सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. अजित कुलकर्णी (एमआयटी स्कूल ऑफ फार्मसीचे डीन),.प्रशांत माने ( संपादक), सुयश खानापुरे (यश डेव्हलपर्स), मनोहर नारायणकर (स्रेह स्वप्न डेव्हलपर्स), सौ. उमा तम्मानवार(महालक्ष्मी ऑक्सिजन) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून हीच आमुची प्रार्थना या प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष प्रांजली मोहीकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा प्रेमचंद मेने, विश्वस्त सौ. ज्योती मेने, वेदांत मोहीकर, संस्थेचे सदस्य राजेश केकडे, दीपक करकी, अनुराधा निकम, अपर्णा पाठक, बालाजी पाठक, आशीर्वाद पाठक, नमोश्री निकम, अॅड. आनंद सागर, प्रतिमा बेणगी, विनायक बेणगी, राजेश्वर पाटील आणि इतरही सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी पाठक यांनी केले.
याप्रसंगी डॉ. अजय पोन्नम(विद्यारत्न पुरस्कार), डॉ. शैलेश पाटील(धन्वंतरी रत्न पुरस्कार), यशवंत पेठकर(पर्यावरण रत्न पुरस्कार), समीर रणदिवे(संगीत रत्न पुरस्कार), राजू अनंतकर(क्रीडा रत्न पुरस्कार), अश्विनी झांबरे(उद्योग रत्न पुरस्कार), अॅड. दत्तूसिंग पवार(कायदे रत्न पुरस्कार), अशोक नावरे(रक्त संजीवन रत्न पुरस्कार, सचिन जगताप(सिने रत्न पुरस्कार), संतोष धाकपाडे(युवा रत्न पुरस्कार)या मान्यवरांचा प्रज्ञावंत पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच निवड समितीतील सदस्यांचा देखील सन्मान करण्यात आला.