मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. सनीचा ‘लाहौर १९४७’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाची एन्ट्री झाली आहे.
सनी देओल सिने-दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बिग बजेट ‘रामायण’ या सिनेमात झळकणार असल्याची चर्चा होती. या सिनेमात तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासह सनीचे नाव आमिर खान आणि राजकुमार संतोषी यांच्या ‘लाहौर १९४७’ या सिनेमासोबत जोडले जात आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अभिनेत्री प्रीती झिंटादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. प्रीतीसह आणखी एक अभिनेत्री या सिनेमाचा भाग असणार असल्याचे म्हटले जात आहे.
आमिर खान प्रोडक्शन हाऊस बॅनरअंतर्गत ‘लाहौर १९४७’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. प्रीती झिंटा या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. एका रिपोर्टनुसार, ‘लाहौर १९४७’मध्ये शबाना आझमीदेखील झळकणार आहेत. शबाना आझमी या सिनेमात एका हिंदू महिलेच्या भूमिकेत झळकणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘लाहौर १९४७’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.