21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयप्रदूषणामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद

प्रदूषणामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी सातत्याने गंभीर होत आहे. यामुळे दिल्लीतील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील असे दिल्­ली सरकारने जाहीर केले आहे.

दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ( पूर्वीचे ट्विटर ) पोस्­ट केली आहे की, प्रदूषण पातळी उच्च राहिल्याने दिल्लीतील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. शाळांना इयत्ता ६-१२ चे वर्ग हे ऑनलाइन घेण्­याचा पर्याय देण्यात आला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्­हटले आहे की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पेंढ्या जाळल्­या गेल्­या आहेत. पंजाबमधून धुराचा दिल्लीवर तितका परिणाम होत नाही जितका हरयाणा आणि उत्तर प्रदेशवर होतो कारण वा-याची हालचाल नाही. दिल्लीत वारा वाहू लागला तरच पंजाबचा धूर दिल्लीत पोहोचेल. सध्या दिल्लीत सर्वत्र धूर आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून तुरीचा धूर दिल्लीत पोहोचत आहे.

सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंगनुसार, दिल्लीतील हवेची गुणवत्ता रविवारी सलग चौथ्या दिवशी ‘गंभीर’ श्रेणीत राहिली, जरी एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी ५०४ च्या तुलनेत ४१० वर किंचित घसरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR