26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रपंतप्रधानांनी दिल्या मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी दिल्या मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. आज संपूर्ण पंढरी वारक-यांच्या भक्तिमय वातावरणात, टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या जयजयकारात दुमदुमून निघत आहे, कारण आज आहे. आषाढी एकादशी. या निमित्ताने अनेक मान्यवर पंढरपुरात दर्शनासाठी जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखिल मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहू या असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR