28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींनी 'डीप फे़क'बद्दल व्यक्त केली चिंता

पंतप्रधान मोदींनी ‘डीप फे़क’बद्दल व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ‘डीप फेक’ (बनावट व्हीडीओ) तयार करण्याच्या ट्रेंडवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी माध्यमांना याबाबत प्रबोधन करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी शुक्रवारी सांगितले की, असे केल्याने अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे प्रसारमाध्यमांनी याबाबत लोकांचे प्रबोधन केले पाहिजे. चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा खोटा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे. अलीकडे या व्हीडीओची खूप चर्चा झाली आहे.

तसेच इस्राईलचे गाझापट्टीवर हल्ले सुरूच आहेत. हे युद्ध काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. याच युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून इस्राईल-हमास युद्धामुळे गाझा पट्टीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या मृत्यूविषयी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या युद्धामुळे पश्चिम आशियातील वाढत्या आव्हानांना तोंड देताना ग्लोबल साउथमध्ये एकता आणि सहकार्याची नितांत गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

भारतामार्फत आयोजित दुसऱ्या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट’ला पंतप्रधानांनी शुक्रवारी संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंसा आणि दहशतवादाविरोधात भारताच्या ठाम भूमिकेवर भर दिला. ‘पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवली आहे. आता वेळ आली आहे की, ग्लोबल साउथच्या देशांनी जागतिक हितासाठी व्यापकपणे एकत्र आले पाहिजे. असे त्यांनी म्हटले.

संवादावर भर
पंतप्रधान म्हणाले की, आम्ही नेहमीच संयम बाळगण्याबाबत बोललो आहोत. आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर दिला आहे. इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्षात नागरिकांच्या मृत्यूचाही आम्ही तीव्र निषेध करतो. आता वेळ आली आहे की ग्लोबल साउथच्या देशांनी जागतिक हितासाठी व्यापकपणे एकत्र आले पाहिजे. असे त्यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR