25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकमध्ये पंतप्रधान मोदींची क्रेझ

पाकमध्ये पंतप्रधान मोदींची क्रेझ

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे नेते आहेत. ते जगभर प्रचंड लोकप्रिय आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही त्यांनी याबाबत मागे टाकले आहे. सप्टेंबरमध्ये ग्लोबल रेटिंग ऍप्रूव्हलने जाहीर केलेल्या जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत. पाकिस्तानातही मोदींचे फॅन्स आहेत.

२९ नोव्हेंबरला पाकिस्तानातूनभारतात परतलेल्या अंजूने याबाबत खुलासा केला आहे. अंजू भारतात परतल्यापासून ती पाकिस्तानातील लोकांबद्दल आणि तिच्या अनुभवांबद्दल नवनवीन गोष्टी शेअर करत आहे. अंजू म्हणते की, तिथल्या लोकांना पंतप्रधान मोदी खूप आवडतात आणि तिथे त्यांचे खूप चाहते आहेत. पाकिस्तानच्या लोकांना केंद्रात नरेंद्र मोदींसारखा नेता हवा आहे. मुलाखतीत अंजूने सांगितले की, तिचे पाकिस्तानातील फेसबुक मित्र नसरुल्लाहसोबत राजकारणाबाबत कोणतेही संभाषण झाले नाही, परंतु तेथे राहिल्यानंतर तिला कळले की पाकिस्तानच्या लोकांना भारतीय पंतप्रधान खूप आवडतात. मोदी आणि भारताबद्दल जाणून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लोकांना खूप उत्सुकता आहे.

अंजूनेही केला दावा
अंजूला लोकं पीएम मोदींबद्दल अनेक प्रश्न विचारायचे. अंजूने असा दावाही केला की, पाकिस्तानी लोकांना वाटते की त्यांच्या देशालाही पंतप्रधान मोदींसारख्या नेत्याची गरज आहे जेणेकरून पाकिस्तानचाही विकास होईल. यावर्षी २१ जुलै रोजी अंजू कुटुंबीयांना न सांगता पाकिस्तानात गेली होती. भारतात अंजूचा पती आणि दोन मुलं आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR