नवी दिल्ली : वृत्तपत्र व्यवसायाचे उत्पन्न झपाट्याने वाढत आहे. उद्योग संघटना फिक्की-ईवायच्या वार्षिक अहवालानुसार, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये मुद्रित (प्रामुख्याने वर्तमानपत्र) माध्यमांच्या कमाईत ४% वाढ झाली. अहवालात २०२६ पर्यंत प्र्रिंटची वार्षिक कमाई ३.४ % वाढेल, अशी अपेक्षा आहे.
पाच वर्षांत प्रथमच, जाहिरातींचे उत्पन्न व वर्तमानपत्रांचा पे रेव्हेन्यू दोन्हींत वाढ झाली. देशभरात पूर्ण पानाच्या जाहिरातींची भरभराट आहे. इंडेक्स डाटानुसार जाहिरातींचे प्रमाण आणि मूल्याने प्री-कोविड पातळी ओलांडली आहे. सलग १० व्या तिमाहीत डीबी कॉर्पचा महसूल आणि नफा वाढला आहे. काही खासगी वर्तमान पत्रांच्या प्रकाशकाने ३१ मार्चला संपलेले आर्थिक २०२२-२३ मध्ये १६९ कोटी रु. निव्वळ नफा कमावला. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या ९ महिन्यांतच कंपनीने ३०३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. मलयाला मनोरमा कंपनीचा निव्वळ नफाही दुपटीने वाढून ८१ कोटी रुपये पोहोचला आहे.
वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात मुद्रित माध्यमांपुढे आहे. मात्र, मुद्रित माध्यमांचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. माध्यमांचे स्वरूप बदलत आहे. डिजिटल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मजकूर येत आहे. तो मजकूर खरा की खोटा, याचा अर्थ लागत नाही. प्रिंट माध्यमांची जबाबदारी वाढते. कारण त्यांना तत्त्व आणि ध्येय टिकवतानाच समाजाला विचारांची दिशा देण्याचे कामही करावे लागणार आहे. वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात मुद्रित माध्यमांपुढे आहे. मात्र, मुद्रित माध्यमांचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. दरम्यान वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान सोशल मीडियाच्या सध्याच्या युगात मुद्रित माध्यमांपुढे आहे. मात्र, मुद्रित माध्यमांचे महत्त्व जराही कमी झालेले नाही.
न्यूजप्रिंटच्या किमती कमी
डीबी कॉर्पचे नॉन-एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर गिरीश अग्रवाल म्हणाले गेल्या तिमाहीत वृत्तपत्रांच्या किमती प्रति टन ५०० डॉलर (रु.४१,३६०) पर्यंत घसरल्या. सर्व वर्तमानपत्रांमध्ये कव्हर किमती वाढल्या आहेत. वर्तमानपत्र छापण्याच्या एकूण खर्चापैकी ४५-५०% कागदाचा वाटा आहे.
जाहिरातदारांना आकर्षण
मीडिया बाइंग एजन्सी लोडेस्टार यूएमचे असोसिएट व्ही. पी. श्रीकांत शेनॉय म्हणाले, प्रिंटने विश्वासाचा स्तर वाढवला आहे. हेच जाहिरातदारांना आकर्षित करत आहे. मलयाला मनोरमाचे कार्यकारी संपादक आणि संचालक जयंत मेमन मॅथ्यू म्हणतात मोठ्या कंपन्यांना जाहिराती मिळत आहेत; डीलर्सला माहिती आहे की नंबर एक आणि २ चे फायदे काय आहेत.