लातूर : प्रतिनिधी
क्रिकेट असोसिएशन फॉर द फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र, ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड, मराठवाडा स्पोर्ट्स कौन्सिल फॉर द ब्लाइंड, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड लातूर व ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द विजवली चॅलेंजड महाराष्ट्र, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंधांच्या एआयसीएफबी राष्ट्रीय कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ सोहळा पार पडला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार अरुण समुद्रे, रामेश्वर बद्दर, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सपना किसवे, ज्येष्ठ समाजसेवक विजय राठी, धनाजी वने, पंकज बेंद्रे, डॉ. माधव गोरे, प्राचार्य डॉ. संजय गवई, प्रा. सुशील शेळके, डॉ. राजकुमार लखादिवे, डॉ. शांतीलाल शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे पंच म्हणून धनाजी काकडे यांनी काम पाहिले. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी तामिळनाडू येथील सेम पॅॅनियल व महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या तनिष वाघमारे यांनी स्पर्धेचे विजेतेपद व उपविजेतेपद आपल्याकडे राखले. तसेच तृतीय पारितोषिक तमिळनाडू येथील जॉन हॅरीस यांनी पटकावले. गुजरातचा राहुल वाघेला चौथ्या स्थानावर व दिल्लीचा अश्विन राजेश पाचव्या स्थानावर यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.