23.9 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रआंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटले

आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटले

शिष्टमंडळाच्या बैठकीत हैदराबाद गॅझेटवर चर्चा

मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातच पुण्यावरून बरेच मराठा आंदोलक शनिवारी रात्री थेट मुंबईत धडकले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, जरांगे यांचे उपोषण सोडविणे यासोबतच मुंबई मंडळ आणि हैदराबाद संस्थानच्या गॅझेटवर चर्चा झाल्याचे समजते.

राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आरक्षणाबाबत मंत्र्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, आज मुख्यमंत्र्यांनी उद्या कॅबिनेट बैठक झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांनी एकत्रित बैठक घेऊन प्रत्येक दिवसाचा फॉलोअप घ्यावा, कुठेही दफ्तर दिरंगाई व्हायला नको. माझ्यावतीने तुम्ही आंदोलनकर्त्यांना विनंती करावी की, उपोषण स्थगित करावे, जरांगे माझे नक्कीच ऐकतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे देसाई यांनी सांगितले.

कुणाच्या तरी ताटातले काढून वाटणार नाही
कुणाच्या तरी ताटातले काढून दुस-याला वाढायचे, ही राज्य सरकारची भूमिका नाही. ओबीसींच्या आरक्षणातून कुठलेही आरक्षण काढले जाणार नाही, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात या बेठकीत चर्चा करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR