28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयमतदार यादीची डिजिटल प्रत द्या

मतदार यादीची डिजिटल प्रत द्या

काँग्रेसची आयोगाकडे मागणी काँग्रेसने दिले पत्राने उत्तर

नवी दिल्ली : १३ दिवसांनंतरही, राहुल निवडणूक आयोगाला भेटायला गेले नाहीत परंतु काँग्रेसने त्यांना उत्तर पत्र पाठवले असून ज्यामध्ये पक्षाने महाराष्ट्र निवडणुकीतील मतदार यादीची डिजिटल प्रत देण्याची मागणी केली आहे. तसेच, मतदानाच्या दिवसाची व्हीडीओग्राफी देखील द्यावी. काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील अनियमिततेच्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. हे पत्र राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्राला निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर आहे.

खरे तर, १२ जून रोजी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना एक पत्र लिहिले होते. ज्यामध्ये राहुल गांधींना विधानसभा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. जर निवडणूक आयोगाने त्यांना एका आठवड्यात डेटा पाठवला तर ते त्याची चौकशी करण्यास आणि निवडणूक आयोगाशी चर्चा करण्यास तयार आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. १२ जून रोजी राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात, निवडणूक आयोगाने लिहिले आहे की, देशात भारतीय संसदेने पारित केलेल्या निवडणूक कायद्यानुसार, त्यांच्या नियमांनुसार आणि वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार निवडणुका अतिशय काटेकोरपणे घेतल्या जातात.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रिया केंद्रीय पातळीवर विधानसभा मतदारसंघ पातळीवर आयोजित केली जाते. यामध्ये निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले १,००,१८६ हून अधिक बीएलओ, २८८ निवडणूक नोंदणी अधिकारी, १३९ सामान्य निरीक्षक, ४१ पोलिस निरीक्षक, ७१ खर्च निरीक्षक आणि २८८ निवडणूक अधिकारी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले १ लाख ८ हजार २६ बूथ लेव्हल एजंट यांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसचे २८,४२१ एजंट आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR