39.5 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeनांदेडगीत, गायन, पोवाडा, पथनाट्य अन् रिल्समधून जनजागृती

गीत, गायन, पोवाडा, पथनाट्य अन् रिल्समधून जनजागृती

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी दि. २६ रोजी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी गीत, गायन,पोवाडा, पथनाटय, ओव्या, रिल्समधून मतदानासाठी जनतेला साद घातली. प्रत्येक कर्मचा-यांने किमान ५० मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा संकल्प शेकोडोंच्या संख्येने, उपस्थित कर्मचा-यांनी नांदेड पोलीस परेड ग्राउंडवर केला.

दुस-या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनात व महानगरामध्ये मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. या कार्यक्रमांमध्ये नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड, खर्च निरीक्षक मग्पेन भुटिया यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माधव सलगर यांच्यासह जिल्हा परिषदेचे, मनपाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी मतदान जनजागृती पोवाडा सादर करण्यात आला. राज्याच्या सदिच्छा दूत डॉ. सानवी जेठवाणी यांनी मनोगत व्यक्त केले. हदगाव तालुक्यातील उमरी येथील विद्यार्थ्यांनी अप्रतिम पथनाट्य सादर केली. मतदान वाढविण्यामध्ये आपले योगदान देणा-या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून तालुकास्तरावरून निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे लक्षवेधी ठरली. एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नृत्य यासोबतच एनसीसी, स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांचे पथसंचलन बचत गटांच्या महिलांसाठी व अंगणवाडी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, स्लोगन, रिल्स, शॉर्ट फिल्म, ओव्या, स्वीप प्रश्नमंजुषा आधीच स्पर्धांमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांसह प्रा.राहुल चौधरी यांना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR