28.4 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरण, आमदार सुनील टिंगरे अखेर समोर

पुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरण, आमदार सुनील टिंगरे अखेर समोर

पुणे : कल्याणीनगरमधील अपघात घडल्यावर आपले परिचित विशाल अगरवाल यांचा फोन आल्याने आपण पहाटे ३ वाजता येरवडा पोलिस ठाण्यात गेलो होतो, पण पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नसल्याचे आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपण कायद्यानुसार कारवाई करावी अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचे सुनील टिंगरे यांनी सांगितले. पुण्यातील बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सामाजित कार्यकर्त्या विनिता देशमुखांनी आमदार सुनील टिंगरेंकडे बोट दाखवले होते. त्यावर सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिले असून आपण केवळ दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यासाठी गेलो असल्याचा खुलासा आमदार टिंगरे यांनी म्हटले आहे.

कल्याणीनगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी आशा बाळगतो. या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केले परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.

माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे ३ च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसेच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा अ‍ॅक्सिडेंट झाल्याचे सांगितले. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलिस निरीक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. मी त्यांना फोन केला असता १५ मिनिटात येत असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यानुसार ते आलेही. पोलिस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलिस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी ६ वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR