22 C
Latur
Tuesday, May 27, 2025
Homeक्रीडापंजाब किंग्सची टॉप २ मध्ये धडक

पंजाब किंग्सची टॉप २ मध्ये धडक

जयपूर : श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील ६९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर ७ विकेट्सने मात करत टॉप २ मध्ये धडक दिली आहे. पंजाबने या विजयासह क्वालिफायर १ चे तिकीट मिळवले आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले होते.

पंजाबने हे आव्हान ९ बॉल राखून पूर्ण केले. पंजाबने १८.३ ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून १८७ धावा केल्या. पंजाबने या विजयासह साखळी फेरीतील शेवट विजयाने केला. तर मुंबईने टॉप २ मध्ये पोहचण्याची संध गमावली.

जयपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या विरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजयासह प्लेऑफ्समधील अव्वल दोनमधील आपलं स्थान निश्चित केले आहे. ११ वर्षानंतर प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारणा-या पंजाबच्या संघ क्वालिफायर १ मध्ये खेळणार हे या सामन्याच्या निकालानं फिक्स झाले आहे.

दुसरीकडे या सामन्यातील पराभवामुळे पहिल्या दोनमध्ये पोहचण्याची मुंबई इंडियन्सची संधी हुकली आहे. आता मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ्सच्यालढतीत एलिमिनेटरचा सामना खेळताना दिसेल. संघाने चालू हंगामात पॉइंट्स टेबलच्या टॉप-२ मध्ये स्थान निश्चित केले आहे. सध्या, संघ १९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR