नांदेड : पंजाब येथील शिख भाविक बिदर येथील गुरुद्वा-यात दर्शन घेवून नांदेड येथे येत असताना देगलूरजवळील कारेगाव फाट्याजवळ ऑटो व ट्रॅव्हलसचा जबर अपघात झाला यात जवळपास १२ ते १५ शिख भाविक जखमी झाले. त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटना मंगळवारी दुपारी घडली.
पंजाब येथील यात्रेकरु बिदर येथे गुरुद्वा-यामध्ये मिनी ट्रॅव्हलने गेले होते. येथील दर्शन आटोपून मंगळवारी पहाटे बिदर येथून नांदेडकडे निघालेल्या शिख भाविकांच्या वाहनाला देगलूर तालुक्यातील कारेगाव फाट्याजवळ एका पॅसेंजर ऑटोची जब्बर धडक झाली. यात सदर भाविकांचे मिनी ट्रव्हल्स रस्त्याच्या कडेला कोसळली. यात जवळपास १२ ते १५ भाविक जखमी झाले आहेत.
उपस्थित नागरीकांनी त्यांना तात्काळ नांदेड येथील गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. जवळपास सर्वांचीच प्रकृती सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगीतले. याप्रकरणी देगलूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.