27.9 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeपरभणीपरभणीत उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

परभणीत उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

परभणी : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढत होत आहे. शहरात काल शनिवारी ४२.६ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आज रविवार, दि. ५ मे रोजी शहरात ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परभणी शहरातील वनामकृविच्या हवामान विभागात आज नोंदवण्यात आलेले तापमान यावर्षीचे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे.

परभणी जिल्ह्यात यावर्षी अतिशय अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे या वर्षी मार्च महिन्या पासूनच जिल्ह्यात तापमानाचा पारा चढताना दिसून येत होता. एप्रिल महिन्यात तापमानाने अनेकवेळा ४० अंशाचा पारा ओलांडला होता. परंतू गेल्या महिन्यात अनेकवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात चढ- उतार दिसून आला. परंतू मे महिना सुरू होताच जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात शनिवार, दि.४ मे रोजी किमान २१.५ तर कमाल तापमान ४२.६ अंशावर पोहचले होते. त्या पाठोपाठ दुसरे दिवशी आज रविवारी किमान २२.४ तर कमाल ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वनामकृविच्या हवामान विभागात करण्यात आली आहे. या वर्षीचे हे सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे.

परभणी शहरासह सर्वच तालुक्यात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरीकांना सकाळ पासून प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी नागरीक घराबाहेर पडण्याचे टाळत असल्याने रस्त्यावर तसेच बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान पुढचे काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने नागरीकांना मात्र तीव्र उकाड्याचा सामना करण्याची वेळ येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR