30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeधाराशिवकष्टाचे पैसे उमेदवाराला

कष्टाचे पैसे उमेदवाराला

कळंब : पूर्वी निवडणुकीत पैशाची गरज नसायची. अलीकडच्या काळात पैशाविणा निवडणूक होणे शक्य नाही. पूर्वी अनेक चांगल्या उमेदवारांना मतदार पैसे, भाजी-भाकरी देऊन प्रचार करायचे. आता बदलत्या काळानुसार उमेदवारांना गाडी, त्याची हॉटेलमध्ये सोय, वरखर्चाला पैसे देऊनही तो आपला प्रचार करतो का नाही, यासाठी त्याच्यामागे विश्वासू कार्यकर्ते ठेवावे लागत आहेत, त्यासाठी वेगळा खर्च लागत आहे.

एकंदर करोडो रुपये खर्च करूनही आपण येऊ की नाही, याची खात्री उमेदवाराला नाही. मग नेमके कोण बदलले आहे, मतदार, उमेदवार की अन्य कोणी…? लाखो रुपये खर्च करायचे आणि करोडो रुपये कमवायचे हाच व्यवसाय पाच वर्षे होत असल्याने मतदारही पैसे दिल्याशिवाय गाडीत बसत नाही.

धाराशिवमध्ये सुटीत एका मुलीने चिंचा फोडून काही रक्कम जमा केली होती, ती रक्कम इतरत्र न जमा करता उमेदवाराला दिली आहे. तिचे मन किती मोठे आहे. जर तिने पैसे दिलेला उमेदवार निवडून आला तर नक्कीच खारीचा वाटा तिचा असेल….तिला त्या उमेदवाराने कायम लक्षात ठेवले पाहिजे.

पूर्वी स्व. भाई उद्धवराव पाटील, स्व. एन. डी. पाटील, स्व. गणपतराव देशमुख, यासारख्या प्रामाणिकपणे काम करणा-यांना मतदार ‘नोट आणि व्होट’ देत होते…आता जमाना बदल गया है…आता उमेदवाराने नोट दिली तरच व्होट देणार असा मतदारांचा वचननामा आह.े

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR