पुणे : ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना नाटकाबाबत अटक करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून ‘जब वी मेट’ हे प्रायोगिक नाटक काल सादर करण्यात आले. या नाटकात रामायणात काम करणा-या नाट्य कलावंतांचे खाजगी आयुष्य दाखवण्यात आले होते.
ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्रने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला आणि नाटक बंद पाडण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाटकाचे दिग्दर्शक, काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून २ फेब्रुवारीला रामायणात काम करणा-या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. ‘जब वी मेट’ नावाच्या या नाटकात रामायणात काम करणा-या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणा-या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली.