27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeराष्ट्रीयशेतक-याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची हजेरी

शेतक-याच्या लेकीच्या लग्नात राहुल गांधींची हजेरी

नववधूला दिले आशीर्वाद

सोनिपत : सोनिपत जिल्ह्यातील गोहाना भागातील मदिना गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक एका शेतक-याच्या घरी पोहोचल्यावर तेथील कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. शेतकरी संजय मलिक यांच्या मुलीच्या लग्नात नववधूला आशीर्वाद देण्यासाठी राहुल गांधी घरी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी शेतकरी संजय मलिक यांना फोन आला होता की, राहुल गांधी त्यांच्या मुलीच्या लग्नाला येणार आहेत. त्यानंतर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राहुल गांधी आपल्या ताफ्यासह मदिना गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबासोबत एक तासापेक्षा जास्त वेळ घालवला. राहुल गांधी यांनी शेतकरी संजय मलिक, त्यांची मुलगी तन्नू मलिक आणि संपूर्ण कुटुंबाची अतिशय साधेपणाने भेट घेतली.

त्यांनी नववधूला आशीर्वाद दिला आणि कुटुंबासोबत बसून भोजनाचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी लग्नातील पारंपरिक पदार्थ जिलेबी, लाडू यांचा आस्वाद घेतला. राहुल गांधी यांना आपल्या घरी पाहून कुटुंबीय अत्यंत आनंदी झाले. एका छोट्या शेतक-याच्या मुलीच्या लग्नासाठी, दिल्लीतील लोकसभा अधिवेशनाच्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढून ते आले, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा भावना कुटुंबाने व्यक्त केल्या.

संजय मलिक आणि त्यांचे भाऊ बलजीत मलिक काही दिवसांपूर्वी लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला राहुल गांधींकडे गेले होते. त्यावेळी राहुल गांधींनी लग्नाला नक्की येईन असे आश्वासन दिले होते आणि त्यांनी आपला शब्द पाळला. यावेळी रोहतकचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा देखील राहुल गांधींसोबत उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR