21.7 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीयवायनाडमधून राहुल गांधींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

वायनाडमधून राहुल गांधींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

बहीण प्रियंका गांधी यांची उपस्थिती
वायनाड : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी वायनाडमध्ये ‘रोड शो ’केला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या ‘रोड शो’मध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. राहुल गांधींनी २०१९ मध्ये पहिल्यांदा वायनाडमधून लोकसभा निवडणुक लढवली होती, त्यावेळी राहुल गांधींचा चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता.

वायनाडमध्ये राहुल गांधींचा रोड शो सकाळी ११ वाजता सुरू झाला. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, तुमचे खासदार होणे हा माज्यासाठी सन्मान आहे. मी तुम्हाला मतदार म्हणून पाहत नाही.

मी तुम्हाला माझ कुटुंब म्हणून पाहतो. कारण माझी आई, बहीण, भाऊ आणि वडील वायनाडमध्ये प्रत्येक घरात राहतात. मला पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करायची आहे, असे राहुल म्हणाले. दरम्यान यावेळी राहुल यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यावरही भाष्य केले ते म्हणाले की, मानव-प्राणी संघर्षाचा मुद्दा सध्या महत्वाचा आहे, यासोबतच वैद्यकीय महाविद्यालय बांधणे यांसारखे मुद्दे आहेत. हे दोन्ही प्रश्न आम्ही सोडवू, दिल्लीत आणि केरळमध्येही आमचं सरकार स्थापन होईल असा विश्वासही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

वायनाडमध्ये तिहेरी लढत
वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राहुल गांधींच्या रॅलीमध्ये त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्याशिवाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि दीपा दास, कन्हैया कुमार, राज्यातील विरोधक विधानसभा सदस्य व्ही.डी. सतीसन आणि केपीसीसी (केरळ प्रदेश काँग्रेस कमिटी) कार्याध्यक्ष एमएम हसन उपस्थित होते.

राहुल गांधी वायनाडमधून दुस-यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) नेत्या अ‍ॅनी राजा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत. यामुळे वायनाडमध्ये तिहेरी लढत पहायला मिळणार असून, केरळमध्ये २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR