नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ : मध्य प्रदेशमध्ये उष्णतेचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. यामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे. शुक्रवारीही नर्मदापुरममध्ये सलग दुस-या दिवशी तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहिले. हवामान विभागाच्या मते, १५ मार्चपासून राज्यातील हवामान पुन्हा बदलू शकते. या काळात काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
उत्तर प्रदेशमध्ये तीव्र उष्णतेचा प्रभाव दिसू लागला आहे. शुक्रवारी राज्यात पहिल्यांदाच दिवसाचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहिले. बांदाचे तापमान ४०.२ अंशावर होते. याशिवाय, झाशीमध्ये ३८.३ अंश आणि उरईमध्ये ३७.८ अंश तापमान नोंदवले गेले. आजही गोरखपूरसह १० जिल्ह्यांमध्ये सकाळी धुके होते.
राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमानात घट झाली. चूरू, अलवरसह अनेक शहरांमध्ये पारा २ अंश ते ४ अंशा पर्यंत खाली आला. हवामान विभागाच्या मते, आज ५ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, धुळीचे वारे आणि पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १५ मार्च रोजी १८ जिल्ह्यांमध्ये वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमधील ८ जिल्ह्यांमध्ये आज पाऊस-बर्फवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, आज उत्तरकाशी, रुद्रप्रयागसह ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. राज्यात कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान सुमारे १७ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
पुढील २ दिवसांचे हवामान
१५ मार्च दिल्लीत बहुतेक ठिकाणी तापमानात वाढ नोंदवली जाईल. मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणासह ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचा इशारा आहे.
१६ मार्च मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अलर्ट आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
राज्यांमधील हवामानाची स्थिती
मध्य प्रदेशात उष्णता वाढल्याने हीट स्ट्रोकचा धोका वाढला आहे. शुक्रवारी नर्मदापुरममध्ये सलग दुस-या दिवशी तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहिले. हवामान विभागाच्या मते, १५ मार्चपासून राज्यातील हवामान पुन्हा बदलू शकते. कारण पाऊस आणि सोसाटयाचा वा-याचा अंदाज आहे.
