मराठवाड्यात काही भागांत पाऊस

छ. संभाजीनगर/बीड : प्रतिनिधी
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यातील काही भागांनंतर राज्यात ब-याच ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात शेतक-यांना दिलासा मिळाला. छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, जिल्ह्यातील काही भागांत बुधवारी दुपारी पाऊस झाला. तसेच लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, आता पाऊस झाल्यास कोवळ््या पिकाला दिलासा मिळणार आहे.

मागच्या आठ दिवसांपासून राज्यातून पाऊस गायब झाला होता. त्यातच मराठवाड्यात तर सर्वसाधारण पाऊस झालेला असतानाच अचानक गायब झाला. त्यामुळे ब-याच भागांत अद्याप पेरणी रखडली आहे. मोजक्याच शेतक-यांनी साधारण पावसावर पेरणी केल्याने कोवळी पिकेही करपत आहेत. अशावेळी बुधवारी काही भागांत आकाशात ढग दाटून आले आणि आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही भागांत आज दमदार पाऊस झाला. यासोबतच बीड जिल्ह्यातही केज, अंबाजोगाई तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ, वरपगाव, राडी, सातेफळ आणि कानडी परिसरात आज दुपारी वा-यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली.याशिवाय परभणी जिल्ह्यातही जिंतूर तालुक्यात पाऊस झाला आहे. त्यातच लातूर जिल्ह्यातही आज दुपारी ढग दाटून आले होते. परंतु काही भागांत हलक्याशा सरी कोसळल्या. त्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, लवकरच दमदार पाऊस कोसळेल, अशी आशा आहे. मराठवाड्यात पाऊस झाला तरच दुष्काळी संकट टळेल अन्यथा बिकट स्थिती उद्भवू शकते.

यासोबतच राज्यात रायगड जिल्ह्यात कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर पावसाने दांडी मारली होती. अखेर आज उत्तर रायगड सह दक्षिण भागातदेखील पावसाने हजेरी लावली. बदलापूरमध्ये सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती. कात्रप, बेलवली, वडवली आणि पनवेल मार्गावर जोरदार पाऊस झाला.

तुरळक ठिकाणीच हजेरी
मराठवाड्यात ब-याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी हा पाऊस तुरळक आणि कमी प्रमाणात झाल्याने शेतक-यांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. या साधारण पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, वातावरण प्रसन्न झाले आणि नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला. मात्र शेतीच्या दृष्टीने हा पाऊस अद्याप अपुरा असल्याचे चित्र आहे.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news