16.5 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeमनोरंजनउद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी ‘राजा शिवाजी’ येतोय

उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी ‘राजा शिवाजी’ येतोय

रितेश देशमुख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर

मुंबई : महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश विलासराव देशमुख आज ४६ वाढदिवस साजरा करीत आहेत. आपल्या मराठी स्वॅगने संपूर्ण सिनेसृष्टी गाजवणा-या रितेशचे लाखो चाहते आहेत. रितेश यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’ पुढील वर्षी रिलीज होणार आहे. सिनेमात मराठी, हिंदी कलाकारांची फौजच आहे. रितेश देशमुख स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत. कालच रितेशने पोस्ट शेअर करत सिनेमाचे शूट पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. तसेच रिलीज डेटही जाहीर केली.

मागे तळपता सूर्य आणि समोर रितेश देशमुख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधला फोटो. ‘राजा शिवाजी’ सिनेमाविषयी पोस्ट करत रितेश यांनी लिहिले, क्षणभर थांबलेला सूर्य..मावळतीचा मावळ..पण क्षणभरासाठीच उद्याच्या तेजस्वी पहाटे साठी… १०० दिवसांची मेहनत, निष्ठा, समर्पण आणि अपार जिद्द यावर अखेर पडदा पडला. असंख्य आठवणी, असंख्य अनुभव, आणि मनात कायम राहणारे क्षण. महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन घेऊन लवकरच येत आहोत.

रितेश देशमुख यांनी हा सिनेमा स्वत: दिग्दर्शितही केला आहे. तर ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुखने सिनेमाची निर्मिती केली आहे. रितेशने पोस्टमध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री लिमये, फरदीन खान, जितेंद्र जोशी यांना टॅग केले आहे. सिनेमाची ही तगडी स्टारकास्ट पाहता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. तसेच ‘राजा शिवाजी’चे हे पोस्टर पाहून अनेकांनी कमेंट करत रितेश देशमुख यांचे कौतुकही केले आहे. त्याच्या या सिनेमाची सिनेसृष्टीतील कलाकारही वाट पाहत आहेत. पुढील वर्षी १ मे रोजी सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR