22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी घेतली दीड लाख मतांची आघाडी

ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी घेतली दीड लाख मतांची आघाडी

नाशिक : लोकसभा मतदारसंघात शिवसेना ( ठाकरे गट ) राजाभाऊ वाजे यांनी १४ व्या फेरी अखेर १ लाख ४७ हजार १२ मतांची आघाडी घेतली आहे. नाशकात शिवसैनिकांनी ढोल – ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला आहे.

राजाभाऊ वाजे यांच्यासह माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख विलास शिंदे आदीसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदार संघातून विजय निश्चित मानला जात आहे.

मुंबईची परसबाग, कुंभ नगरी, वाईन कॅपिटल मंदिरांचे शहर, तपोभूमी, द्राक्ष पंढरी अशी विविध ओळख असलेल्या नाशिकचा खासदार होण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराज असे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, अपेक्षेनुसार शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात झालेल्या प्रमुख लढत झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR