28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रराजेश कुमार यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली

राजेश कुमार यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली

राजेश कुमार यांनी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी सोमवारी मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी मंत्रालयातील अनेक सनदी अधिका-यांनी राजेश कुमार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. मुख्य सचिवपदी नियुक्त झालेले राजेश कुमार ४९ वे सनदी अधिकारी आहेत.

पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक आज नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या जागी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांची नियुक्ती केली आहे. राजेश कुमार हे १९८८ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. पुढील दोन महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मुख्य सचिव म्हणून काम करण्यास राजेश कुमार यांना जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने पुढील आदेश होईपर्यंत महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे कायम ठेवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR